Shilpa Shetty Took Darshan Of Ganpati : शिल्पा शेट्टीनं घेतलं लालबाग राजासह सह्याद्री क्रीडा मंडळाच्या गणपती बाप्पाचं दर्शन - Ganpati Bappa
Published : Sep 22, 2023, 6:22 PM IST
|Updated : Sep 22, 2023, 10:19 PM IST
मुंबई :मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या गणपती दर्शनानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी सह्याद्री क्रीडा मंडळाच्या गणपतीचं दर्शन घेतलंय. टिळक नगरमधील प्रसिद्ध अशा सह्याद्री क्रीडा मंडळाचा गणेशोत्सव दरवर्षी अतिशय थाटात साजरा केला जातो. याच गणपती बाप्पाचं दर्शन सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं आज घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या आई देखील उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी ईटीव्ही भारतशी खास बातचीत केलीय. माझं बालपण इथंच गेल्यामुळं माझे आईवडील आम्हाला गणपती दर्शनाला घेऊन जात असत. मला इथं येऊन समाधान मिळतं, अशी प्रतिक्रिया त्यांनी बोलताना दिली. माझी मुलं आता शाळेत आहेत. मात्र, त्यांना वेळ मिळाल्यानंतर मी गणपती दर्शनाला घेऊन येईन असं शेट्टी म्हणाल्या. गणपती बप्पानं सेवा करण्याची आम्हाला संधी दिली, त्यांनी आम्हाला खूप काही दिलंय. त्यांचे फक्त आशीर्वाद मला हवे आहेत, असं शिल्पा शेट्टी यावेळी बोलताना म्हणाल्या.