शरद पवारांची पुण्यात तुफान फटकेबाजी, अजित पवारांना सडेतोड उत्तर; पाहा संपूर्ण पत्रकार परिषद - Sharad Pawar press conference in Pune
Published : Dec 2, 2023, 7:23 PM IST
पुणे Sharad Pawar :उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (१ डिसेंबर) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबाबत अनेक गौप्यस्फोट केले होते. याला आता शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. त्यांनी शनिवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. "अजित पवार यांनी सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी मला पहिल्यांदाच कळल्या", असं ते म्हणाले. "मी राजीनामा देण्याचा निर्णय सामूहिकरित्या झाला होता. भाजपासोबत जायचं नाही अशी आमची भूमिका होती. मात्र ज्यांना जायचं होतं ते त्यांच्यासोबत गेले. मी त्यांना परत कधीच बोलावलं नाही", असं शरद पवार यांनी सांगितलं. "आमची भूमिका भाजपाविरोधी आहे, शिवसेना विरोधी नाही", असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. पाहा काय म्हणाले शरद पवार..