Video काय ते ट्रॅफिक, काय तो कोल्हापूर सांगलीचा रोड, एकदम ओक्के म्हणायची शहाजीबापूंवर वेळ - आमदार शहाजी बापू पाटील
कोल्हापूर काय ते ट्रॅफिक... काय तो कोल्हापूर सांगलीचा रोड.. एकदम ओक्के.. म्हणण्याची वेळ सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील MLA Shahaji Bapu Patil यांच्यावर आली आहे. मुसळधार पावसामुळे कोल्हापूर सांगली मार्गावरील हातकणंगले येथे रोडवर मोठा खड्डा पडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. हातकणंगले येथे जवळपास 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यावेळी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या सुद्धा वाहनांचा ताफा अडकला. यावेळी त्यांना सुद्धा काय ते ट्रॅफिक... काय तो सांगलीचा रोड.. एकदम ओक्के... म्हणण्याची वेळ आली. त्या ट्रॅफिकमध्ये अर्धा ते पाऊण तास अडकलेल्या शहाजीबापूंना कशी बशी पोलिसांनी वाट करून दिली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST