Prize Of Dream 11: सुरक्षारक्षक रातोरात झाला करोडपती; ड्रीम 11 मध्ये जिंकले दोन कोटी रुपये - prize of Dream 11
भरतपूर : जिल्ह्यातील मादापूर गावात राहणारा खेम सिंह गुडगावमधील एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. खेम सिंह 16,000 रुपयांची मासिक नोकरी करून उदरनिर्वाह करतो. पण 1 आठवड्यापूर्वी खेम सिंहने ड्रीम 11 खेळायला सुरुवात केली. खेम सिंहने सांगितले की, तो एक सामना हरला होता. पण शुक्रवारी चेन्नई आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात खेम सिंहने त्याचा ड्रीम 11 संघ निवडला. या सामन्यात खेम सिंहच्या संघाने सर्वाधिक 707.5 गुणांची कमाई करत प्रथम क्रमांक पटकावला. 2 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जिंकली. खेम सिंहने सांगितले की, आतापर्यंत त्याच्या बँक खात्यात ६९ लाख रुपये ट्रान्सफर झाले आहेत. 66.50 लाखांची प्रक्रिया सुरू आहे. त्यांच्या कुटुंबात तीन भाऊ आहेत. सर्व भावांची लग्ने झाली आहेत. खेम सिंह सर्वात लहान आहे. पत्नी आणि मुले गावात राहतात, असे त्याने सांगितले.