महाराष्ट्र

maharashtra

स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती

ETV Bharat / videos

Sambhaji Raje Chhatrapati News : मला मुख्यमंत्री करा मग तुमचे प्रश्न सुटणार, असं का म्हणाले माजी खासदार संभाजीराजे? पाहा व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 12, 2023, 12:08 PM IST

कोल्हापूर Sambhaji Raje Chhatrapati : सरसकट फेलोशिप मिळावी यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापुरातील सारथी उपकेंद्राबाहेर संशोधक विद्यार्थी गेल्या 13 दिवसांपासून साखळी उपोषणाला बसले आहेत.  शनिवारी संध्याकाळी स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या विद्यार्थ्यांशी मागण्यांसंदर्भात चर्चा केली. यावेळी विद्यार्थ्यांनी हा प्रश्न तुम्हीच सोडवू शकता, आम्हाला न्याय मिळवून द्या, अशी साद घातली. यावर ऐन दिवाळीत उपोषण करू नका, असा सल्ला छत्रपती संभाजीराजेंनी विद्यार्थ्यांना दिला. मात्र, विद्यार्थ्यांनी आम्हाला निर्णय द्या, आम्ही उपोषण मागे घेतो असा पवित्रा घेतला.  यावेळी मला मुख्यमंत्री करा, सारथीचा प्रश्न चुटकीत सोडवतो, असे मिश्कीलपणे संभाजीराजेंनी सांगितले. एकीकडं राज्यात मराठा आरक्षणाचा विषय गंभीर होत चालला असताना दुसरीकडं मराठा संशोधक विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी 13 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. याकडं सरकारचं लक्ष नाही. दिवाळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ घेऊन हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही यावेळी संभाजीराजेंनी स्पष्ट केलं.

ABOUT THE AUTHOR

...view details