Sambhaji Brigade: महाराष्ट्र भूषण पुरस्कार आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- संभाजी ब्रिगेडची मागणी - organizers of Maharashtra Bhushan Award Programme
पुणे :रविवारी राज्य शासनाच्यावतीने आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमात 12 जणांचा उष्माघात आणि चेंगराचेंगरीमुळे जीव गेला आहे. बरेचजण आयसीयुमध्ये आहेत. अशा या कार्यक्रम आयोजनाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री प्रधान सचिव यांच्यासह आप्पा धर्माधिकारी यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, अशी मागणी संभाजी ब्रिगेड यांनी केली आहे. नवी मुंबईतील खारघर येथे रविवारी महाराष्ट्र भूषण सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. या सोहळ्यात आलेल्या लोकांपैकी 12 जणांना उष्माघात आणि चेंगराचेंगरीमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच 50 जण गंभीर आहेत. त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आले आहे. एकाच घरातील लोकांना दोनदा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जात आहे. हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे की, ब्राह्मण भूषण पुरस्कार आहे. एवढ्या मोठ्या राज्यात जर एकच समाजातील व्यक्ती यांना या पुरस्कारासाठी दिसत असेल तर संशयाची बाब आहे. रविवारी कार्यक्रमात ज्या लोकांना उष्माघात आणि चेंगराचेंगरीमुळे जीव गमवावा लागला आहे. त्याची नैतिक जबाबदारी घेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री प्रधान सचिव यांच्यासह आप्पा धर्माधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी संतोष शिंदे यांनी केली.