NCP Rally : शरद पवारांच्या बीडमधील सभेत लोकांना बसायला मंडप पुरणार नाही- रोहित पवार
बीड :राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवारांनी पहिली सभा येवल्यामध्ये घेतली होती. आता त्यांची दुसरी सभा 17 ऑगस्ट रोजी बीड जिल्ह्यामध्ये होणार आहे. ही सभा राज्यातील सभांमध्ये इतिहास घडवणारी असेल, असा दावा शरद पवार समर्थक आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांच्या दाव्यानुसार, 40 हजार लोक मंडपात बसू शकतील इतका मोठा मंडप टाकण्यात आला आहे. पण या सभेसाठी 60 ते 70 हजार लोक या कार्यक्रमाला येणार आहेत. म्हणून हा मंडपदेखील या कार्यक्रमाला अपुरा पडणार आहे. शरद पवारांवर अनेक लोक प्रेम करतात. त्याच्यामुळे ही सभा राज्यात नक्कीच इतिहास घडवणारी सभा आहे.
राम शिंदेंना प्रश्न : एमआयडीसी संदर्भामध्ये आम्ही ही जागा मिळवणार आहोत. त्यामुळे येणाऱ्या काळात राम शिंदे यांनी काही जरी म्हटले, तरी आम्ही त्या जागेबद्दल कोणत्या ना कोणत्या मार्गाने ती जागा एमआयडीसीसाठी उपलब्ध करुन घेणार आहोत. जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील तरुणांना रोजगार मिळणार आहे. राज्यामधल्या काही महामंडळांमध्ये पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होणार आहे. मात्र दीड वर्ष तुम्ही नेमके काय केले? दीड वर्षांमध्ये तुमच्या एकाही महामंडळावर नियुक्ती झाली नाही. महामंडळ तर सोडाच पण जी सारथी, बार्टी, महाज्योती आहे, त्यांना ते निधी देत नाहीत. मागच्या सरकारमध्ये आम्ही दिले, मात्र यांना या विषयाशी काहीही देणेघेणे नाही. ज्या लोकांना फोडले आहे त्यांना खूश ठेवण्याचे काम या सरकारकडून सुरु आहे. हे सरकार फक्त सत्तेबद्दल विचार करत आहेत. यांना सामान्य जनतेची पर्वा नाही, या शब्दांत माजी मंत्री राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्या दाव्याचा समाचार घेतला.