महाराष्ट्र

maharashtra

रविकांत तुपकर

ETV Bharat / videos

Ravikant Tupkar On Govt Policy: सरकारचे धोरण सोयाबीन, कापूस उत्पादकांच्या विरोधात - रविकांत तुपकर - सरकारच्या धोरणावर रविकांत तुपकर यांचे मत

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 8, 2023, 9:52 PM IST

बुलडाणाRavikant Tupkar On Govt Policy:महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कोणतं पीक घेतल्या जात असेल तर ते सोयाबीन आणि कापूस. (Ravikant Tupkar) परंतु, या पीक उत्पादकांकडे महाराष्ट्र सरकारचं आणि केंद्र सरकारचं कायमच दुर्लक्ष राहिलेलं आहे. सोयाबीन, कापूस उत्पादकांना (soybean and cotton farmer) हे त्यांचे गिनतीत सुद्धा धरायला तयार नाही. (soybean and cotton prices fall) आजची परिस्थिती अशी आहे की, सोयाबीन आता एक महिनाभरामध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनचे दर पडलेले आहेत. (soybean and cotton prices) साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचा दर आहे आणि उत्पादन खर्च मागच्या वर्षीचा प्रतिक्विंटल हा 5700 होता. आता या वर्षीचा जो किमान 6500 च्या पुढे सरकलेला असताना म्हणजे लावायचे जास्त आणि आणायचे पैसे कमी अशी परिस्थिती आहे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मांडले आहे. 

तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरणं कठीण होईल:गेल्या वर्षाचा चाळीस-पन्नास टक्के सोयाबीन, कापूस अजून शेतकऱ्यांच्या घरामध्ये पडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रचंड रोष हा सोयाबीन कापूस उत्पादकांच्या मनामध्ये सरकार बद्दल आहे. इकडे टोमॅटोवाला शेतकरी असेल किंवा कांदेवाला शेतकरी असेल यांनी जसं आता राज्यकर्त्यांना अडवण्याची भूमिका घेतली आहे अशाच पद्धतीने राज्य सरकारला आणि केंद्र सरकारच्या सगळ्या नेत्यांना सोयाबीन, कापूस उत्पादकांच्या रोशाला येणाऱ्या काळामध्ये सामोरे जावे लागणार आहे. तर सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि सरकारचे धोरण मात्र सोयाबीन कापूस उत्पादकांच्या विरोधात आहे. त्यामुळे सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांची पोर रस्त्यावर मंत्र्यांना फिरणं सुद्धा येणाऱ्या काळामध्ये मुश्किल करतील अशी परिस्थिती आहे, असेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details