महाराष्ट्र

maharashtra

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

ETV Bharat / videos

'संविधानाला कोणी हात लावला तर मी गप्प बसणार नाही', रामदास आठवले का झाले आक्रमक ? पाहा व्हिडिओ - सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 1, 2023, 7:05 AM IST

पालघर Ramdas Athawale On Constitution  :पालघर तालुक्यातील सफाळे इथल्या विराथन खुर्द या ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रा समारोप समारंभ कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या अनोख्या शेरो शायरीच्या अंदाजात विरोधकांवर टीका केली. तसंच मोदी सरकार म्हणजे सर्व सामान्यांचं सरकार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात बलवान व्यक्तिमत्व असल्याचंही ते यावेळी म्हणाले. 2024 साली पुन्हा मोदी सरकार येणार असं म्हणत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रचंड आदर आहे. त्यामुळे संविधान बदललं जाणार असल्याचा विरोधकांकडून चुकीचा प्रचार केला जातोय. तसंच खोटे आरोप करत चुकीचे गैरसमज पसरवले जात आहेत. मी या मंत्रीमंडळात आहे आणि मी संविधानाचं संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी आहे. जर संविधानाला कोणी हात लावला तर मी गप्प बसणार नाही. कोणीही असं संविधान बदलू शकत नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. 

ABOUT THE AUTHOR

...view details