महाराष्ट्र

maharashtra

Raj Thackeray

ETV Bharat / videos

वाहनांची रांग पाहून राज ठाकरे उतरले टोल नाक्यावर; मग काय झालं? पाहा व्हिडिओ - खालापूर टोल

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 7, 2024, 9:27 PM IST

Updated : Jan 7, 2024, 10:51 PM IST

मुंबई Raj Thackeray on Toll Naka :राज्यात मनसे आणि टोल नाका यांचं एक समीकरणच आहे. टोल नाक्यांवरील खळ्ळ खट्याकमुळं मनसे नेहमी चर्चेत राहते. राज ठाकरे यांचा एक आदेश अन् मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोल नाका फोडलाच समजा हे निश्चितच आहे. मात्र, रविवारी राज ठाकरे हे एका वेगळ्याच अंदाजात दिसून आले. खालापूर टोल नाक्यावर वाहनांची भलीमोठी रांग लागली होती. त्याचवेळी राज ठाकरे हे तिथून मुंबईकडं जात होते. टोल नाक्यावर वाहनांची रांग पाहून राज ठाकरे हे गाडीतून खाली उतरले आणि वाहनांना लवकर तेथून सोडण्यास सुरुवात केली. तसंच त्यांनी टोल नाक्यावरील मॅनेजरलाही दम भरल्याचं या व्हिड़िओमधून दिसून येतंय.    

राज ठाकरेंचा टोल नाका मॅनेजरला दम : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पिंपरी चिंचवडमध्ये सुरू असलेल्या 100 व्या नाट्य संमेलनाला रविवारी हजेरी लावली होती. कार्यक्रम संपल्यावर ते मुंबईला जात होते. दरम्यान, खालापूर टोल नाक्यावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लागलेल्या रांगा पाहून राज ठाकरे संतापले. त्यानंतर ते स्वतः गाडीतून खाली उतरले आणि थेट तेथील मॅनेजरची भेट घेऊन त्याला चांगलंच खडसावलं. यावेळी मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांच्यासह मोठ्या प्रमाणात मनसेचे कार्यकर्तेही उपस्थित होते. मनसे आणि टोल नाका आंदोलन हे समीकरणच आहे. टोल नाके बंद करण्यासाठी मनसेनं अनेक आंदोलनं केली. त्यामुळं राज्यातील अनेक टोल नाके बंदही झाले आहेत.  

Last Updated : Jan 7, 2024, 10:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details