महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Pune Koyta Gang : पोलिसांनी दिला कोयता गॅंगच्या गुंडाना चोप! पाहा, काय म्हणाले पोलिस अधिकारी...

By

Published : Dec 30, 2022, 4:31 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

मागच्या महिन्याभरापासून पुणे शहरात कोयता गँगने Koyta gang दहशत माजवली असून पर्वा पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणाऱ्या सिंहगडलॉ कॉलेज परिसरात दोन सराईत गुन्हेगारांनी हातात कोयते घेऊन दहशत माजवली. पोलिसांनी या दोन सराईत गुन्हेगारांना चांगलीच चोप दिला आहे. पुण्यातील सिंहगड लॉ कॉलेज रोडवर दोन तरुणांनी हातात चाकू सूरे घेऊन दहशत निर्माण केली होती. परिसरातील दुकानांमध्ये जाऊन अनेक लोकांना त्यांनी त्यांच्या हातातील शस्त्रांनी दहशत निर्माण केली. यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला होता. रस्त्यात जो दिसेल त्याला चाकू दाखवून भीती दाखविली जात असल्याने वाहनधारक देखील स्तब्ध झाले होते. अखेर पोलिसांना सूचना मिळताच पोलीस हजर झाले आणि या दोघा गुंडांना पोलिसांनी Pune police arrested two gangsters चांगलाच चोप देऊन या कोयता गँगचा करेक्ट action against the Koyta gang in Pune कार्यक्रम केला आहे. या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांशी ईटीव्हीने संवाद साधला. पाहूयात...
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details