महाराष्ट्र

maharashtra

निकालानंतर प्रकाश सुर्वे यांनी साजरा केला आंनद

ETV Bharat / videos

Maharashtra Political Crisis: सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आमदार प्रकाश सुर्वे यांनी धरला ठेका; पाहा व्हिडिओ - Prakash Surve Reaction After sc verdict

By

Published : May 11, 2023, 9:46 PM IST

मुंबई: संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या सत्ता संघर्षाच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिवसेना शिंदे गटाकडून आज ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला. मुंबईच्या मागाठाने विधानसभा क्षेत्रात आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिसर पूर्व परिसरात ढोल ताशाच्या गजरात मोठी रॅली काढून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी आमदार प्रकाश सुर्वे यांनी ढोल ताशाच्या गजरावर ठेका धरल्याचे पाहायाला मिळाले.
 


१६ आमदारांच्या निर्णयाचे प्रकरण: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर नुकताच सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. अपात्र ठरलेल्या १६ आमदारांच्या निर्णयाचे प्रकरण पुन्हा एकदा सभापतींसमोर आले. तर अंतिम निर्णय 7 सदस्यीय खंडपीठाकडे सोपवण्यात आला होता. या सर्व प्रकारानंतर राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत आपली प्रतिक्रिया दिली. 



बहुमताचे सरकार स्थापन झाले: पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही कायदेशीर चौकटीत बसून सरकार स्थापन केले. आज सर्वोच्च न्यायालयाने त्यास मान्यता दिली आहे. यापूर्वी अनेक लोक घटनाबाह्य सरकारला बेकायदेशीर सरकार म्हणून नाकारत होते. पण आज त्यांना जोरात थप्पड मारून संपवले आहे. पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, लोकशाहीत बहुमत महत्त्वाचे असते. या देशात एकच संविधान, एक कायदा, एकच नियम आहे. याच्या बाहेर कोणीही जाऊ शकत नाही. आम्ही स्थापन केलेले सरकार कायदेशीर चौकटीत स्थापन झाले. बहुमताचे सरकार स्थापन झाले आणि आज सर्वोच्च न्यायालयाने त्यास मान्यता दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. अपात्र ठरवण्याचा अधिकार सभापतींना आहे, ही आमची भूमिका आहे. न्यायालयाने हे अधिकार राष्ट्रपतींना दिले आहेत. निवडणूक आयोगाने आम्हाला पक्ष म्हणून ओळखले आणि धनुष्यबाण दिले. न्यायालयाने राजकीय आणि विधिमंडळ बाजूने भाष्य केले.
 

ABOUT THE AUTHOR

...view details