Vedanta Foxconn project : वेदांत प्रकल्प गुजरातमध्ये जाण्याकरिता कोणते सरकार जबाबदार? प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट सांगितले! - प्रकाश आंबेडकरांची सरकारवर टीका
वेदांत समूह आणि फॉक्सकॉन यांच्या ( Vedanta Foxconn project ) भागीदारीतून तीन टप्प्यांत महाराष्ट्रात येऊ घातलेली १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आता गुजरातकडे वळवल्याच्या मुद्द्यावरुन राज्यामध्ये राजकरण चांगलेच तापले आहे. या गुंतवणुकीसाठी गुजरातची निवड केल्याचे वेदांत समूहाने जाहीर ( Vedanta Foxconn project moves to Gujarat ) केले असून, या प्रकल्पामुळे उभे राहणारे पूरक छोटे उद्योग, लाखोंचा रोजगार, शेकडो कोटींच्या कर महसुलास महाराष्ट्राला मुकावे लागणार आहे. हे शिंदे-फडणवीस सरकारचे अपयश असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपल मत व्यक्त केलं ( Prakash Ambedkar on Vedanta Foxconn project )आहे.ते म्हणाले की हा जो प्रकल्प गुजरात ला गेला आहे त्याला दोन्ही सरकार जबाबदार आहे.एकूणच राज्यातील विविध प्रश्न तसेच सध्या चर्चेत असलेल्या वेदांत बाबत प्रकाश आंबेडकर यांच्याशी खास बातचीत ( Prakash Ambedkar Criticize Government ) केली आहे. पाहूयात, ( Government responsible for Vedanta Foxconn project move to Gujarat )
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST