Prakash Ambedkar : 'इंडिया की भारत' ही भाजपाची खेळी अन् खेळीला विरोधक पडले बळी - प्रकाश आंबेडकर - Prakash Ambedkar
Published : Sep 7, 2023, 11:55 AM IST
|Updated : Sep 7, 2023, 12:04 PM IST
पुणे :Prakash Ambedkar : देशभरातील विरोधकांच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या आघाडीला 'इंडिया' नाव देण्यात आलंय. यानंतर आता केंद्र सरकारच्या वतीनं देशाचं नाव इंडिया ऐवजी भारत करण्याचं प्रयत्न सुरू केलं जातं आहे. यावरून देशभर चर्चा सुरू झाली असून, विरोधकांकडून आता भारत या नावावरून टीका केली जात आहे. (India And Bharat Controversy) यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, इंडिया की भारत यावरुन देशभरात चर्चा सुरू आहे. ही चर्चा भाजपाची एक खेळी असून, त्यांच्या या खेळीला 'इंडिया' आघाडीतील विरोधक हे बळी पडले आहेत.
पहिल्यांदाच 'भारत' हा शब्द सरकारनं वापरला :संविधानात इंडिया आणि भारत हे दोन्ही शब्द आहेत. त्यामुळं कुठल्याही सरकारला या दोन्ही शब्दांपैकी एक नाव वापरता येते. आतापर्यंतच्या सरकारनं इंडिया हा शब्द वापरला आहे. पहिल्यांदाच भारत हा शब्द या सरकारनं वापरण्यासंदर्भात विचार सुरू केला आहे. 'इंडिया' आघाडीचा पोकळपणा दाखवण्यासाठी भाजपाने भारत या नावाची चर्चा सुरू केली आहे. 'इंडिया' आघाडीनं यातून लवकर बाहेर पडावं, असं यावेळी आंबेडकर म्हणाले.