माजी आमदार नरसय्या आडम यांना दिलेला शब्द मोदींनी पाळला; 'रे नगर'च्या उद्घाटनसाठी पंतप्रधान मोदी आज सोलापुरात - PM Modi in Solapur
Published : Jan 19, 2024, 12:55 PM IST
सोलापूर :पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी 19 जानेवारी रोजी सोलापुरात आहेत. शहरापासून अकरा किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभारी गावाजवळ साडेतीनशे एकर जमिनीवर तीस हजार कामगारांसाठी 'रे नगर' गृहप्रकल्प साकारला आहे. सोलापुरातील कामगार तसंच माकप नेते माजी आमदार नरसय्या आडम यांच्या पुढाकाराने 'रे नगर' हौसिंग सोसायटी स्थापन करण्यात आली आहे. दोन हजार कोटी रुपयांचा खर्च 'रे नगर हौसिंग सोसायटी'च्या निर्माणासाठी झाला असल्याची प्राथमिक माहिती माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिली आहे. शुक्रवारी 15 हजार कामगारांना नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वतःच्या हक्काच्या घरांच्या चाव्या दिल्या जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 साली माजी आमदार नरसय्या आडम यांना शब्द दिला होता. 'रे नगर'च्या उदघाटनसाठी मी येणार, आज तो शब्द पूर्ण होत आहे.