महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video कार्तिक पौर्णिमेला हरिद्वारमध्ये जमला श्रद्धेचा महापूर, लाखो लोकांनी गंगेत स्नान करून कमावले पुण्य - हरिद्वारमध्ये जमला श्रद्धेचा महापूर

By

Published : Nov 8, 2022, 11:03 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

कार्तिक पौर्णिमेनिमित्त Kartik Purnima हरिद्वार या पवित्र नगरीमध्ये सकाळपासूनच गंगेत स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सकाळपासूनच हरकी पायडी येथे स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी होऊ लागली होती. हरकी पायडीवर लाखो भाविक गंगेत श्रद्धेने स्नान करून पुण्यप्राप्तीसाठी प्रार्थना करत आहेत. या दिवशी गंगेत स्नान केल्याने सुख, समृद्धी आणि पापांपासून मुक्ती मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या स्नानाच्या पार्श्वभूमीवर पोलीस-प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण जत्रा क्षेत्र 9 झोन आणि 13 सेक्टरमध्ये विभागले गेले आहे. लोकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी सुमारे दीड हजार पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत तीर्थक्षेत्र हरिद्वारमध्ये कार्तिक पौर्णिमेच्या स्नानाला आज पहाटे ४ वाजल्यापासून सुरुवात झाली. कडाक्याची थंडी असतानाही मोठ्या संख्येने भाविकांनी गंगेत स्नान करून पुण्य मिळवले. हरकी पायडी येथे स्नान करणे सुरू आहे. स्नान उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. ज्योतिषांच्या मते या दिवशी गंगेत स्नान केल्याने पापांचा नाश होतो. शीख धर्माचे धार्मिक गुरू गुरु नानक देव यांचा प्रकाश उत्सवही याच दिवशी साजरा केला जातो.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details