महाराष्ट्र

maharashtra

गौतमी पाटील

ETV Bharat / videos

Gautami Patil Event : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात शेड कोसळून लोक जखमी - गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात शेड कोसळून लोक जखमी

By

Published : May 9, 2023, 10:40 AM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) -  गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला लोक तासनतास आगोदर येऊन जागा पकडून बसलेले चित्र आपण नेहमी पाहत असतो. नृत्यांगना म्हणून प्रसिद्ध असलेल्या गौतमी पाटीलचा कार्यक्रम पाहणे काही चाहत्यांना चांगलेच महाग पडले. वैजापूर महालगाव येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात दुकानासमोरील पत्र्याचा शेड तुटून लोक खाली पडल्याची घटना समोर आली आहे. एका दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी गौतमी आली असताना तिला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. जागा मिळेल तिथे लोक उभे राहिले. त्यात एका दुकानाच्या समोर असलेल्या पत्र्याच्या शेडवर क्षमतेपेक्षा जास्त लोक उभे राहिले. त्यामुळे कार्यक्रम सुरू असतानाच काही वेळात शेड कोसळले. ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित झाली असून या घटनेत काही लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details