संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी शरद पवार दिल्लीत दाखल, पाहा व्हिडिओ - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
Published : Dec 4, 2023, 10:36 AM IST
नवी दिल्ली Sharad Pawar In Delhi : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून (4 डिसेंबर) सुरुवात होत आहे. विरोधी आघाडी 'इंडिया'च्या नेत्यांची रणनीती पुन्हा तयार करण्यासाठी सोमवारी सकाळी बैठक पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीत दाखल झाले आहेत. दुसरीकडं राष्ट्रवादी खरी कुणाची याबाबत निवडणूक आयोगातदेखील सुनावणी होणार आहे. विधानसभा निवडणूकांमध्ये चार राज्यांच्या निकालानंतर आज दुसऱ्याच दिवशी होत असलेल्या अधिवेशनाकडं सर्वांच लक्ष लागलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचा संसदेत आणि निवडणुकीच्या मैदानात मुकाबला करण्यासाठी विरोधक एकत्र येणार आहेत. अशा स्थितीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार इंडियाची एकजूट कशी बांधणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे.