Electricity Workers Strike : उस्मानाबादमध्ये वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा ग्रामीण भागात फटका, दीडशे गावांचा वीजपुरवठा खंडित - Workers Strike
उस्मानाबाद - जिल्हयातील दीड हजार वीज कर्मचारी तर, राज्यातील एक लाख 28 हजार कायम, कंत्राटी कर्मचारी आज पासुन ७२ तासाच्या संपावर ( Electricity Workers Strike ) गेले आहेत. वीज कंपन्यांचे खाजगीकरण ( Privatization of power companies ) होऊ नये या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. राज्यातील वीज कंपन्यांचे खाजगीकरण केले जाणार आहे. अदानी ग्रुपसोबत करार करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती कामगारांना मिळाल्याने त्यांनी त्यास विरोध सुरू केला आहे. महावितरण, महानिर्मिती, महापारेशन कंपनीचा यामध्ये समावेश असणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST