Osmanabad Crime News: आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या निकटवर्तीय सुरेश कांबळे यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल, आत्महत्येपूर्वी तरूणाने केले गंभीर आरोप - गुन्हा दाखल
उस्मानाबाद : जिल्ह्यातील भुम येथील एका तरुणाने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यात त्याने बार्शी येथील डॉ. नंदकुमार स्वामी व भुम येथील सुरेश भाऊ कांबळे यांचे नाव घेतले आहे. मानसिक जाच व मारहाणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे सांगत त्याने स्थानिक पोलिसांवर यांच्यावर गंभीर आरोप करीत काही अपेक्षा सुद्धा व्यक्त केल्या आहेत. फैयाज दाऊद पठाण असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. नेमका या तरुणाला काय व कोणत्या कारणाने जाच होता, हे व्हिडिओमध्ये नसले तरी त्याला 20 जुन रोजी कांबळे यांनी मारहाण केल्याचे व धमकी दिल्याचे म्हटले आहे. पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला गेल्यावर तिथे सुद्धा बाहेर त्याला धमकावण्यात आले. आत्महत्या केल्यावर कुटुंबाचे रक्षण करा. माझ्या मृतदेहाला मुंग्या लागल्या तरी चालेल मात्र तो देऊ नका, अशी कळकळीची विनंती त्याने केली आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या निकटवर्तीय सुरेश कांबळेसह 4 जणांवर गुन्हा नोंद केला आहे, अशी पोलिसांनी माहिती दिली आहे.