महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Vedanta Foxconn Agitation - राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड - Nationalist Congress MP Supriya Sule

By

Published : Sep 15, 2022, 1:04 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर शिवसेना आणि इतर विरोधी पक्षांनी चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबईत आज शिवसेनेतर्फे सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात पुण्यात शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार निर्देशने ( Agitation against Shinde-Fadnavis government ) करण्यात आली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचे पहायला मिळाले. वेदांता, फॉक्सकॉन प्रकल्प ( Vedanta Foxconn project ) गुजरातला गेल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी विरोधक आक्रमक झाले असून शिंदे-फडणवीस सरकारविरोधात टीकेची ( Eknath Shinde Govt ) जोड उठवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे ( Nationalist Congress MP Supriya Sule ) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील सुमारे १.५४ लाख हक्काचे रोजगार हिरावले गेले. असे त्यांनी म्हटले .
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details