Umesh Patil Criticized on Bhagirath Bhalke: भगीरथ भालकेंनी कावळ्याप्रमाणे काव काव केली तर, काठी घेऊन हाकलतील- उमेश पाटील - उमेश पाटील
सोलापूर : सोलापुरात राष्ट्रवादीचे नेते व बीआरएस नेते आमनेसामने आले आहेत. एकमेकांवर टीका करण्याची थोडीही संधी सोडत नाहीत. पंढरपूर येथे झालेल्या कार्यक्रमात भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकत भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला आहे. प्रवेश सोहळ्याला तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर बोलताना भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांवर सडकून टीका केली होती. उमेश पाटील यांना मोहोळचा पोपट असे संबोधले होते. भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी उत्तर देत कावळा म्हणून संबोधले आहे. बीआरएस पक्षाच्या प्रवेश सोहळ्यात कावळ्याने काव काव केली. कावळ्याने खूपच काव काव केली तर आपण त्यांना हाकलून लावतो, अशीही टीका उमेश पाटील यांनी केली. भगीरथ भालकेनी राष्ट्रवादीला खुल आवाहन दिले होते. पंढरपूर तालुक्यातील सरकोली या गावात भगीरथ भालके यांचा मंगळवारी बीआरएस पक्षात प्रवेश झाला. त्यावेळी भगीरथ भालकेनी राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांवर टीका केली. विशेषतः उमेश पाटील यांवर टीका केली होती.