महाराष्ट्र

maharashtra

धनंजय मुंडे

ETV Bharat / videos

Dhananjay Munde : शरद पवार आमचे पांडुरंग, शेवटच्या श्वासापर्यंत...; धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने पुन्हा चर्चेला उधाण - धनंजय मुंडे शरद पवार आमचे पांडुरंग

By

Published : Aug 20, 2023, 5:29 PM IST

बीड : 'शरद पवार आमचे पांडुरंग आहेत. वारकऱ्यांच्या घरात असलेल्या पांडुरंगाचा फोटो काढण्याबद्दल कोर्ट काही निर्णय घेऊ शकतो का? पांडुरंग व्यक्त होऊ शकत नाही, मात्र आमचं दैवत व्यक्त होतंय. सध्या आम्हाला त्यांच्या जवळ जागा नसेल, मात्र त्यांना आमच्या मनात कायम स्थान आहे. हे स्थान शेवटच्या श्वासापर्यंत राहील', असे कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले. ते बीडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. या सह त्यांनी 27 ऑगस्टला बीडमध्ये होणाऱ्या अजित पवारांच्या जाहीर सभेबद्दलही माहिती दिली. या सभेला राज्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व मंत्री उपस्थित राहतील, असे धनंजय मुंडे म्हणाले. तसेच ही सभा ऐतिहासिक होणार असून या पूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडले जातील, असेही ते म्हणाले. पाहा हा व्हिडिओ...

ABOUT THE AUTHOR

...view details