महाराष्ट्र

maharashtra

मुस्लिम बांधवांनी केलं रक्तदान

ETV Bharat / videos

Muslims Brothers Blood Donation : मशिदीमध्ये रक्तदान करून मुस्लिम बांधवानी दिला समाजाला 'हा' संदेश, पाहा व्हिडिओ - blood donation in mosque

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2023, 7:19 PM IST

Updated : Sep 25, 2023, 7:29 PM IST

ठाणे Muslims Brothers Blood Donation : उल्हासनगर शहरातील ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त सुन्नी जामा मस्जिद ट्रस्टच्या वतीनं आज सम्राट अशोक नगर येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. रक्तदान शिबिरात 150 पेक्षा अधिक मुस्लिम बांधव आणि विविध धर्माच्या बांधवांनी सहभाग घेतला. त्यांनी मशिदीमध्ये रक्तदान करून मानवतेचा आदर्श घालून दिलाय. यावेळी रक्तदान शिबिराला माजी आमदार पप्पू कलानी यांनी भेट देऊन आयोजकांना प्रोत्साहन दिलंय. त्याचबरोबर मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी उपस्थित राहून रक्तदात्यांचं व आयोजकांचं कौतुक केलंय. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी सुन्नी जामा मस्जिदचे विश्वस्त आसिफ शेख, मन्सूर शेख, इस्माईल शेख, शरीफ भाई, तोसिफ शेख यांच्यासह बिलाल शेख, इम्तियाज अन्सारी, निहाल अख्तर, अल्ताफ मुन्शी, आमिर चौधरी, अशरफ अन्सारी यांनी परिश्रम घेतले. चांद चौधरी, झीशान, अमित चौधरी, मुन्शी, अल्मास या सर्वांनी परिश्रम घेतले. रक्तदान शिबिरात जमील खान, फिरोज खान, दशरथ चौधरी, रामेश्वर गवई, आदिनाथ पालवे, नाना पवार, नसीर खान, अस्लम शेख, गौतम ढोके, नीलेश देवडे, मोनू सिद्दीकी, सोनू शेख, यांसह समाजातील विविध नेत्यांनी रक्तदान केलंय. शरद म्हात्रे, करण रणवीर उम्मीद फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व विविध नागरिक उपस्थित होते.

Last Updated : Sep 25, 2023, 7:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details