मुंबईत अग्नीतांडव! कांदिवलीतील 23 मजली इमारतीला भीषण आग - आगीवर नियंत्रण
Published : Jan 15, 2024, 10:16 AM IST
मुंबई Kandivali fire news : मुंबईतील कांदिवली भागातील 'एसआरए' या 23 मजली इमारतीला सोमवारी (15 जानेवारी) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तसंच प्राथमिक माहितीनुसार ही आग इमारतीच्या 13 व्या मजल्यावरील डक्ट एरियामध्ये लागली. दरम्यान, आगीची माहिती मिळताच इमारतीतील सर्वजण खाली आले. या घटनेत अद्याप कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नसून मुंबई अग्निशमन विभागाकडून देखील यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. तसंच यापूर्वी रविवारी (14 जानेवारी) डोंबिवली परिसरात असलेल्या लोढा फेज 2, खोना एस्ट्रेला टॉवरला भीषण आग लागली होती. या आगीत इमारतीच्या पाच ते सहा मजल्यांच्या गॅलरी जळून खाक झाल्या होत्या. मात्र, इमारतीत फक्त तिसऱ्या मजल्यापर्यंत लोक राहत असल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही.