महाराष्ट्र

maharashtra

मुंबई डबेवाल्यांकडून पुणेरी पगडी उपरणची भेट

ETV Bharat / videos

Mumbai Dabewala Gift: किंग चार्ल्स यांचे आज राज्यारोहण, पदग्रहण सोहळ्यासाठी मुंबई डबेवाल्यांना निमंत्रण, महाराष्ट्राची 'ही' देणार भेट - खजिनदार सुनील शिंदे

By

Published : May 3, 2023, 2:21 PM IST

Updated : May 6, 2023, 7:44 AM IST

मुंबई : इंग्लंडची राणी एलिझाबेथ हिच्या निधनानंतर येत्या 6 मे रोजी राजपुत्र किंग चार्ल्स हे इंग्लंडचे नवे राजे म्हणून त्यांचा राज्याभिषेक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या राज्याभिषेक सोहळ्याचे निमंत्रण मुंबईच्या डबेवाल्यांना देखील ब्रिटिश दुतावासाकडून पाठवण्यात आले आहे. मुंबईचे डबेवाले आणि किंग चार्ल्स यांचं पूर्वपार मैत्रीसंबंध आहेत. त्यामुळे मुंबईत ब्रिटनच्या उच्चायुक्तांतर्फे मंगळवारी एका सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला किंग चार्ल्स यांचे जवळचे मित्र मानले जाणाऱ्या मुंबईतल्या डबेवाल्यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. या सोहळ्यात किंग चार्ल्स यांच्या पदग्रहण सोहळ्यासाठी डबेवाल्यांनी पुणेरी पगडी भेट म्हणून पाठवली आहे. तसेच डबेवाल्यांची ओळख असलेली गांधी टोपी देखील त्यांना भेट देण्यात आली आहे. मंगळवारी मुंबईतील ताजमहल हॉटेलमध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुंबईतील अनेक उद्योजक महाराष्ट्र सर्कल सरकारमधील अधिकारी कॉमनवेल्थ देशाचे कौन्सिल जनरल उपस्थित होते. या संदर्भात माहिती देताना मुंबई डबेवाला संघटनेचे खजिनदार सुनील शिंदे यांनी सांगितले की, राणी एलिझाबेथ यांचे निधनानंतर प्रिन्स चार्ल्स तिसरे हे ब्रिटनचे महाराज बनत आहेत. सहा तारखेला त्यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. 2004 पासून प्रिन्स चार्ज व डबेवाल्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. 2004 साली झालेल्या भेटीनंतरच डबेवाल्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळाली. हेच मैत्रीपूर्ण संबंध आज देखील कायम आहेत. ही मैत्री लक्षात घेता भारतातील ब्रिटनचे उच्चायुक्त यांनी हॉटेल ताज येथे राज्याभिषेक सोहळ्याच्या समारंभाचे निमंत्रण आम्हाला दिले होते. त्या पार्श्वभूमीवर डबेवाल्यांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. प्रिन्स चार्ल्स यांना पुणेरी पगडी व शाल भेट दिली.

Last Updated : May 6, 2023, 7:44 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details