Video : पुण्यात मनसेची महाआराती, पुण्येश्वर मंदिराला छावणीचं स्वरूप - Raj Thackeray Hanuman Chalisa
पुणे - पुण्यात अजूनपर्यंत कुठेच हनुमान चालीसा लावण्यात आली नाही. याउलट सकाळी ११ वाजता पुण्यातील खालकर चौकातील हनुमान मंदीरात ज्याठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते पहिल्यांदा महाआरती करण्यात आली होती त्याचठिकाणी आज पाहिली आरती होणार असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर सकाळी 11 वाजता कसबा पेठेतील पुण्येश्वर मंदिरात महाआरती करण्यात येणार आहे. या महाआरतीला अद्याप परवानगी देण्यात आली नाही. मात्र मनसे आरती करण्यावर ठाम आहे. याच मंदिराच्या बाजूला दर्गा देखील आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजीत पोते यांनी...
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST