MNS Protest On Toll : राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसैनिक आक्रमक, बुलढाण्यात पडसाद - मनसैनिक
Published : Oct 10, 2023, 12:48 PM IST
बुलडाणा MNS Protest On Toll : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या टोलबाबतच्या इशाऱ्यानंतर आता मनसैनिक आक्रमक झाल्याचं चित्र बघायला मिळतंय. राज ठाकरेंनी काल (9 ऑक्टोबर) इशारा देताच त्याचे पडसाद आज (10 ऑक्टोबर) बुलडाण्यात दिसून आले. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली खामगाव रस्त्यावर मनसैनिकांनी आंदोलन सुरू केलं असून सकाळी आठ वाजेच्या सुमारास मनसे कार्यकर्त्यांच्या वतीनं या टोलनाक्यावरून छोटी चार चाकी वाहनं टोल न घेता सोडण्यात आली. दरम्यान, राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन टोलबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. आमची माणसं टोलनाक्यावर उभी राहणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) सांगितल्याप्रमाणे लहान वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही. जर याला विरोध केला तर हे टोलनाके आम्ही जाळून टाकू, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या इशाऱ्याचे पडसाद आज अनेक ठिकाणी बघायला मिळत आहेत.