Maharashtra Political Crisis: शरद पवार यांनी जे पेरले तेच उगवले प्रकाश महाजन...! - प्रकाश महाजन बीड दौरा
बीड : राज्याच्या राजकारणामध्ये जो काही राजकीय भूकंप झाला आहे, यानंतर मनसेचे नेते प्रकाश महाजन हे बीड दौऱ्यावर आले आहेत. (Maharashtra Political Crisis) यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, सर्व चोर एकत्र येऊन राज्याला वेड्यात काढण्याचा प्रयत्न करत आहेत. (MNS leader Prakash Mahajan) सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी यांच्याकडून काय आदर्श घ्यायचा? ज्या पद्धतीने शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर दर्शन घेतले आहे. (Prakash Mahajan Beed tour) त्याच पद्धतीने स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीवर दर्शन घेऊन केलेल्या पापाचे प्रायशित्य करायला पाहिजे होते. जे त्यांनी पेरलं तेच उगवलं आणि तेच कापलं, असे माध्यमांशी बोलताना प्रकाश महाजन म्हणाले. (Prakash Mahajan criticism of Sharad Pawar) ते म्हणाले की, जर त्यांना सत्तेत जाऊन बसायचं होतं तर राजीनामे देऊन पुन्हा त्यांनी सत्तेत बसणे गरजेचे होते. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वेड्यात काढण्याचे काम सध्याचे सत्ताधारी करत आहेत.