MNS Diwali 2022 शिवाजी पार्कवर दीपोत्सव मनसेचा, शुभारंभ एकनाथ शिंदे अन् फडणवीसांच्या हस्ते
मुंबई दोन वर्षानंतर यंदा कोरोना मुक्त वातावरणात दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. मनसेच्यावतीने शिवाजी पार्क मैदानावर शिवाजी पार्क दीपोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र येणार आहेत. दरवर्षी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिवाळीच्या निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करून विद्युत रोषणाई केली जाते. यावर्षीही शिवसेना भवन ते शिवाजी पार्क मैदानाभोवती विद्युत लाईट्स लावण्यात आले आहेत. मध्यभागी मनसे प्रमुख राज ठाकरे, युवा नेते अमित ठाकरे फोटो असलेले कंदील लक्ष वेधून घेत आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिंदे गट आणि मनसेच्या युतीची शक्यता वर्तवली जात होती. दीपोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने हीच युतीची नांदी ठरण्याची शक्यता आहे. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ दीपोत्सवाच्या शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केला जाणार आहे. राज ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने मोठ्या प्रमाणात मनसेने या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST