महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Ganeshotsav 2022 : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सहकुटूंब घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन - MNS chief Raj Thackeray with family

By

Published : Sep 3, 2022, 1:41 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सहकुटुंब सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शन Raj Thackeray Siddhivinayak ganpati darshan घेतले. गणेश चतुर्थीचा Ganesh Chaturthi आजचा चौथा दिवस असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी सुद्धा दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे आगमन झाले Ganeshotsav 2022 होते. या बाप्पाचे आता विसर्जन झाल्यानंतर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबईत विविध ठिकाणी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जाताना दिसत आहेत. सिद्धिविनायक मंदिरात सहकुटुंब गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर ते जीएसबी येथील गणपती मंडळात गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेले आहेत. त्याचबरोबर अनेक नामवंत राजकीय नेत्यांनी राज ठाकरे यांच्या घरी सुद्धा गणपती दर्शनासाठी हजेरी लावली होती. त्या अनुषंगाने राज ठाकरे हे अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details