Uday Samant : खासदार विनायक राऊत यांच्या टिकेनंतर आमदार उदय सामंत यांची संयमी प्रतिक्रिया
रत्नागिरी : शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात ( Shiv Sena's Nirdhar Mela ) खा. विनायक राऊत यांनी केलेल्या टीकेला ( Criticism by MP Vinayak Raut ) शिवसेना आमदार उदय सामंत यांनी संयमी प्रतिक्रिया ( MLA Uday Samant Restrained Response on criticism ) दिली आहे. "शिवसेनेच्या ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी भाषणं केली त्यांना मला अजिबात दोष द्यायचा नाही, शेवटी खासदार विनायक राऊत साहेबांचंदेखील भाषण झालं ते मी पूर्ण ऐकलं. ते माझ्यावर चिडेलेले आहेत, पण त्यामध्ये त्यांचा दोष नाही. त्यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका केली, त्याबद्दल मला राग नाही. ज्यांनी ज्यांनी माझ्यावर टीका केली, त्यांच्या टीकेला मी अजिबात उत्तर देणार नाही, खासदार विनायक राऊत यांनीदेखील मी उत्तर देणार नाही. यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे, तसेच त्यांचा गैरसमज काही दिवसांतच दूर होईल" अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST