MLA Sanjay Gaikwad on Shasan Aplya Dari: उद्या 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम यशस्वी होईल, कोणताही राडा होणार नाही- संजय गायकवाड - Shasan Aplya Dari Programme in Buldhana
Published : Sep 2, 2023, 9:41 PM IST
बुलडाणा MLA Sanjay Gaikwad on Shasan Aplya Dari :रविवारी बुलडाणा जिल्ह्यामध्ये 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तीन ते चार वेळा या कार्यक्रमाची तारीख बदलल्यानंतर उद्या हा कार्यक्रम बुलडाणा येथे पार पडणार आहे. पण शुक्रवारी जालना जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जमुळे राज्यातली परिस्थिती काहीशी गंभीर झालीय. यावर आमदार संजय गायकवाड यांनी उद्याच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाबाबत एक मोठं वक्तव्य केलंय. आम्हीसुद्धा मराठा समाजाच्या या आंदोलनामध्ये सहभागी आहे. वेळोवेळी आरक्षणाची मागणी पुढे रेटली आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचा मी एक शासनाचा भाग आहे. बुलडाणा मतदारसंघात हा कार्यक्रम होत आहे, त्यामुळे मी आयोजक देखील आहे. त्यामुळे असा कोणताही येथे राडा होणार नसल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय.