MLA bachchu kadu फक्त ट्रेलर झाला पिक्चर तो अभी बाकी है - बच्चु कडू - फक्त ट्रेलर झाला पिक्चर तो अभी बाकी है
एकीकडे एकनाथ तर दुसरीकडे देवेंद्र असल्यामुळे मध्यावधी निवडणूक लागण्याची शक्यता नसल्याची माहिती शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू MLA Bachu Kadu यांनी माध्यमांशी बोलताना दिली. आता पर्यंत फक्त ट्रेलर झाला पण संपूर्ण पिक्चर बाकी असून सरकार मजबूत असून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे कडू यांनी सांगितले. राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता असल्याच्या बातम्या काल प्रसारमाध्यमांमध्ये धडकल्या होत्या. त्या अनुषंगाने उध्दव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या वक्त्यावर बच्चू कडू यांनी ही प्रतिक्रिया दिली. राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता असल्याचे भाकीत उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागा. असे आदेश शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची व विधानसभा संपर्क प्रमुखांची काल उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरेंनी मध्यावधी निवडणुका बाबत भाकित केले होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST