Meera Borwankar Book : अजित पवारांचा काहीही संबंध नाही; तत्कालीन विभागीय आयुक्तांची 'ईटीव्ही भारत'ला Exclusive माहिती
Published : Oct 15, 2023, 6:41 PM IST
|Updated : Oct 15, 2023, 6:52 PM IST
पुणे : Meera Borwankar Book :पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Meera Borwankar on Ajit Pawar) यांच्यावर पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकात गंभीर आरोप (Madam Commissioner Book) केले आहेत. येरवडा येथील पोलीस दलाच्या 3 एकर जमिनीचा लिलाव करण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतल्याचा गंभीर आरोप मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या 'मॅडम कमिशनर' या पुस्तकात केलाय. याबाबत तत्कालीन विभागीय आयुक्त दिलीप बंड (Dilip Band on Meera Borwankar Book) यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने संवाद साधला. त्यावेळी बंड म्हणाले की, या प्रकरणात अजित पवारांचा काहीही संबंध नाही.
काय आहे प्रकरण? : येरवड्यातील त्या जागेजवळ एका डेव्हलपरची देखील जागा होती. त्यांनी प्रस्ताव दिला की तुमचं पोलीस स्टेशन आम्ही बांधून देतो, तुमची जागा आम्हाला द्या. तेव्हा विभागीय आयुक्त म्हणून मी, तेव्हाचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग तसेच तत्कालीन चीफ सेक्रेटरी अयंगार मॅडम अशा आम्हा तिघांना तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी बैठकीला बोलावलं आणि त्या प्रस्तावाबाबत सांगितलं होतं, असे बंड म्हणाले.
जागेबाबत प्रस्ताव 'असा' झाला मंजूर : दिलीप बंड पुढे म्हणाले की, तेव्हा मी मंत्री महोदय यांना सांगितलं की, एक्सचेंजमध्ये देऊन आपल्याला काय फायदा होणार आहे. जर पोलिसांसाठी क्वार्टर बनवून दिली तर ते फायद्याचं होईल, कारण तेव्हा शिवाजीनगर येथील पोलीस वसाहत मोडकळीस आली होती. तेव्हा मंत्री महोदय म्हणाले की, ठीक आहे. मुख्य रस्त्यावर पोलीस स्टेशन आणि मागे वसाहत असं बांधता येईल. तेव्हा कन्सल्टंट नेमण्यात आला आणि मग टेंडर काढण्यात आलं. त्यात 60 टेंडर हे आले होते. त्यातील एव्हरस्माईल कन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी 495 घरे बांधून देतो असा प्रस्ताव होता. तेव्हा आमच्या सात लोकांच्या कमिटीने हा प्रस्ताव पोलीस आयुक्तांना पाठवला आणि मग आम्ही त्याला मान्यता दिली. शासनाने देखील त्याला मान्यता दिली होती. त्यानंतर वर्क ऑर्डर देखील देण्यात आली.
बोरवणकर यांची सहमती नव्हती :आम्ही जेव्हा काम सुरू करायला गेलो तेव्हा ताबा मिळालेला नव्हता. त्याचवेळी तेव्हाचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांची बदली झाली आणि त्याच ठिकाणी मीरा बोरवणकर यांची पोलीस आयुक्त पदी नियुक्ती झाली. मात्र, बोरवणकर यांची या प्रकरणाला सहमती नव्हती, अशी माहिती दिलीप बंड यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली.