महाराष्ट्र

maharashtra

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

ETV Bharat / videos

मराठी पाट्यांसाठी मनसे पुन्हा एकदा आक्रमक, एमजी मोटर्सच्या पाट्यांवर फेकले काळ्या शाईचे फुगे; पाहा व्हिडिओ - supreme court deadline for Marathi signboards

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 27, 2023, 8:17 AM IST

ठाणे MNS On Marathi Name Plate :सर्वोच्च न्यायालयानं मराठी पाट्यासंदर्भात दिलेली मुदत संपताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.  ठाण्यातील मनसैनिकांनी रविवारी (26 नोव्हेंबर) एमजी मोटर्सच्या शोरूमच्या इंग्रजी पाटीवर काळ्या शाईचे फुगे फेकून  निषेध नोंदवला. प्रत्येक पाटीवर मराठीमधील नाव हे ठळकपणं लिहिलं जावं यासाठी मनसेकडून अनेकदा आक्रमक आंदोलनंदेखील करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब करत मराठी पाट्यांची सक्ती केली होती. इंग्रजी पाट्या मराठीत करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेली मुदत संपताच मनसेनं पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील मानपाडा येथील एमजी मोटर्सच्या शोरूमवर असलेल्या इंग्रजी पाटीवर काळ्या शाईनं भरलेले फुगे फेकण्यात आले. ठाण्यातील सर्वच आस्थापनांवर असलेल्या इंग्रजी पाट्यांना त्वरित मराठीतून करावं अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पुन्हा एकदा आक्रमक आंदोलन करण्यात येईल असा इशारा ठाण्यातील मनसैनिक स्वप्नील महिंद्रकर यांनी दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details