मराठा आरक्षणासाठी आज दिल्लीमध्ये मोठ्या हालचाली, संभाजीराजे छत्रपती दिल्लीमध्ये दाखल, पहा व्हिडिओ - केंद्रिय मागासवर्ग आयोग
Published : Nov 28, 2023, 11:14 AM IST
नवी दिल्ली Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज (28 नोव्हेंबर) स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मराठा समाजाचे शिष्टमंडळ केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश मिळवून देण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे छत्रपती आणि मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची भेट घेतली होती. मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी सर्वस्तरावर संभाजीराजे छत्रपती मनोज जरांगेंच्या पाठीशी उभे असल्याचं दिसून येतंय. सोबतच संभाजीराजेंना कायदेशीर प्रक्रिया माहित असल्यानं ते विषेश पुढाकार घेत असल्याचं बघायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर आज मराठा आरक्षणासाठी दिल्लीमध्ये मोठ्या हालचाली होत आहेत. आज दुपारी 3 वाजेच्या दरम्यान संभाजीराजे अन् शिष्टमंडळ दिल्ली येथील केंद्रीय मागासवर्ग आयोगात अयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची भेट घेणार आहेत. त्यामुळं या भेटीत नेमकं काय घडेल याकडं सर्वांचंच लक्ष लागलय.