Manoj Jarange On Devendra Fadnavis : 'जे मराठाद्वेषी आहेत त्यांचेच चेले...', मनोज जरांगेंची सदावर्तेंसह देवेंद्र फडणवीसांवर टीका - एक मराठा लाख मराठा घोषणा
Published : Oct 14, 2023, 11:23 AM IST
जालना Manoj Jarange On Devendra Fadnavis : आंतरवाली सराटीत आज मनोज जरांगे पाटलांची जाहीर सभा होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हिंसक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सभेपूर्वी मनोज जरांगे पाटलांना तातडीनं अटक करा, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली होती. त्यानंतर आता गुणरत्न सदावर्तेंना त्यांच्या मालकांनी समज द्यावी, असं म्हणत जरांगे पाटलांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय. 'गुणरत्न सदावर्ते हे कुणाचे चेले आहेत, हे आम्हाला माहितीये. जे मराठाद्वेषी आहेत, त्यांचेच ते चेले आहेत. त्यामुळं त्यांच्या मालकानं त्यांना समज द्यावी. 'एक मराठा लाख मराठा घोषणा' द्यायची आणि मराठ्यांना विरोध करायचा, असं काही नेत्यांचं धोरण आहे. गोरगरीबांचं आरक्षण रद्द करुन त्यांच्या ताटात विष कसं कालवायचं, हे नेत्यांना माहितये. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अशा पद्धतीचे माणसं अंगावर घालून कायदा व सुव्यवस्था बिघडवू नये', असा इशाराही मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे.