Manisha Kayande : मनीषा कायंदेंचा राहुल शेवाळेंवर गंभीर आरोप, पाहा काय म्हणाल्या कायंदे - राहुल शेवाळे
नागपूर, विधानसभेत सत्ताधारी पक्षाकडून AU-AU अश्या घोषणा देत जोरदार गोंधळ घालण्यात आला. A म्हणजे आदित्य आणि U म्हणजे उद्धव असा अर्थ होत असल्याने या प्रकरणाची चौकशी व्हावी या मागणीसाठी विधानसभेचे कामकाज अनेकवेळा तहकूब करावं लागलं. खासदार राहुल शेवाळे Rahul Shewale यांनी हे संपूर्ण प्रकरण पुढे आणले आहे. राहुल शेवाळे यांच्या विरुद्ध एका महिलेने अतिशय गंभीर आरोप केले आहेत असा खुलासा शिवसेच्या आमदार मनीषा कायंदे Manisha Kayande यांनी केला आहे. Manisha Kayande accusation on Rahul Shewale. मात्र या प्रकरणावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप मनीषा कायंदे यांनी केला आहे. पाहा काय म्हणाल्या मनीषा कायंदे.. Manisha Kayande during winter session in nagpur
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST