पत्नी नांदायला येl नाही म्हणून नवरोबाचे 'शोले स्टाइल' आंदोलन - गोद्रे
पुणे - पत्नी नांदायला येत नाही म्हणून नवरोबाने शोले स्टाइल आंदोलन केले. शोले चित्रपटात ज्या पद्धतीने वीरू पाण्याच्या टाकीवर चढतो, त्या पद्धतीने जुन्नर तालुक्यातील गोद्रे येथील वीजेच्या टॉवरवर चढून आंदोलन केले. एका बाटतील पेट्रोल व काडीपेटीही त्याने सोबत नेली होती. तो 'वीरू' संगमनेर तालुक्यातील असून त्याची पत्नी गोद्रे (ता. जुन्नर) येथील रहिवासी आहे. या दोघांना 21 डिसेंबर रोजी विवाह झाला असून घरगुती वादामुळे पत्नी माहेरी आली आहे. यापूर्वीही म्हणजेच दोन दिवसांपूर्वी पती त्या टॉवरवर चढला होता. पोलीस, स्थानिक नागरिकांच्या मध्यस्थी करुन त्याला खाली उतवरले होते. त्यानंतर पती पत्नी दोघेही सोबत गेले. मात्र, दोघांचा वाद मिटला नाही. माफी मागूनही पत्नी घरी येत नसल्याने तो पुन्हा वीजेच्या तब्बल दीडशे फूट उंच असलेल्या टॉवरवर चढला. स्थानिक नागरिकांनी व कुटुंबीयांनी विणवणी केल्यानंतर तब्बल दीड तासांनी तो खाली उतरला. स्थानिकांनी त्याची समजूत काढली. पण, ती नांदायला गेली नाही तर पुढे काय, असा सवाल नागरिकांना पडला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST