Mahila Congress Protest : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याविरोधात पुण्यात महिला काँग्रेस आक्रमक
पुणे : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या विरोधात देशभरात काँग्रेस पक्ष आक्रमक होत असून आंदोलने तसेच निदर्शने केली जात आहे. आज देखील पुण्यात महिला काँग्रेस तसेच विविध समविचारी पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने पुण्यातील फडके हौद येथे तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मूक आंदोलन करण्यात आले आहे. या मूक आंदोलनात काँग्रेस व समविचारी पक्षातील सर्व नेते, पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी या महिलांकडून तोंडाला काळ्या पट्ट्या बांधण्यात आले होते. या देशात संविधान संपविण्याचा कट तसेच प्रजातंत्राची हत्या लोकशाहीची हत्या हे सर्व राहुल गांधी यांच्या खासदारकी रद्द करण्यामागे दिसत आहे. राहुल गांधी यांची जी खासदारकी रद्द करण्यात आली आहे. यातून हेच स्पष्ठ होत आहे की, त्यांच आवाज दाबण्याचा प्रयत्न आज देशात मोदी सरकारकडून केलं जात आहे. 2019 मधील केस बाबत आत्ता लगेच निर्णय देखील लागले जात. तसेच संसदेत देखील लगेच निर्णय केला जात आहे. आज ज्या प्रमाणे राहुल गांधी देशात बोलत आहे तसेच भ्रष्टाचार विरोधात काम करत आहे. त्यांना देशातील भाजप सरकार ही घाबरली असून त्यांच्यावर घाबरून कारवाई केली जात आहे, असे यावेळी महिला काँग्रेस उपाध्यक्ष संगीता तिवारी यांनी सांगितले. आज देशात हिटलर शाही सुरू झाली असून हम करे सो कायदा ना बाप का डर ना मा का डर बेटा निकला व्होलेंटर अशी अवस्था आज केली आहे. म्हणून आज आम्ही मूक आंदोलन करत एका प्रतिमेत आर्ध मोदी आर्ध हिटलर यांचे फोटो दाखवत निषेध व्यक्त करत असल्याच देखील यावेळी तिवारी यांनी सांगितले.