राज्यात पुढील 4 दिवस अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज - maharashtra rain news update
Published : Nov 23, 2023, 7:52 AM IST
पुणे Maharashtra Weather Update : हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकण, गोवा या ठिकाणी 23 नोव्हेंबर रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची अन् मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर 24,25,26 आणि 27 नोव्हेंबर रोजी काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच मध्य महाराष्ट्रात देखील 23 ते 25 नोव्हेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 26 आणि 27 नोव्हेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी पाऊस पडू शकतो. दरम्यान, मराठवाड्यात 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तसंच विदर्भात 24 नोव्हेंबर रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून 25 ते 27 नोव्हेंबर रोजी काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.