महाराष्ट्र

maharashtra

Etv Bharat

ETV Bharat / videos

ST Employees : एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलिनीकरण होणार? Watch Video - एसटी कर्मचारी शासनात विलिनीकरण

By

Published : Jul 18, 2023, 8:03 PM IST

मुंबई - राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत भाजपच्या भूमिकेत सोयीनुसार बदल झाल्याचा घणाघाती आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज विधानसभेत केला. एसटी महामंडळावरील एका प्रश्नाच्या चर्चेदरम्यान त्यांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.  

सारवासारव करण्याचा प्रयत्न - एसटी महामंडळावरील एका प्रश्नावर चर्चा होत असताना महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत राज्य शासनाची भूमिका काय? असा उपप्रश्न अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला. परिवहन खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असून, ते नवी दिल्लीला गेलेले असल्याने त्यांच्यावतीने एसटी संदर्भातील प्रश्नांना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे उत्तरे देत होते. मात्र, अशोक चव्हाण यांनी विचारलेल्या थेट उपप्रश्नाला दादा भुसे यांना स्पष्ट उत्तर देता आले नाही. त्यामुळे चव्हाण यांनी पुन्हा एकदा विचारणा करून राज्य सरकारच्या भूमिकेत स्पष्टता आणण्याची मागणी केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करून याबाबत न्यायालयाच्या निर्देशानुसार महाविकास आघाडीने जी भूमिका घेतली होती, तीच आमची भूमिका असल्याचे उत्तर देवून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.  

भाजपच्या भुमिकेत सोयीनूसार बदल - यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले की, भाजपच्या भूमिकेत सोयीनुसार बदल होत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षातील भाजप नेत्यांनी सातत्याने हा प्रश्न लावून धरला होता. त्यावेळी एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्याबाबत आक्रमक भूमिका भाजपाने घेतली होती. मात्र, सत्तेत आल्यानंतर भाजपने याविषयी घुमजाव केल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details