दलित समाजातील नागरिकांची घरे जमिनदोस्त करण्याचे प्रकरण, महिला आक्रमक
पलामू झारखंडच्या पलामू इथे दलित समाजातील नागरिकांचे घर पाडण्याचे प्रकरण चांगलेच गाजले Demolition case of Dalit community citizens आहे. मंगळवारी मुरुमाटू गावात दलितांचे पूर्नवसन करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न फसला. शासकीय आधिकारी येताच महिला चांगल्याच आक्रमक Women protest against settling Mahadalits झाल्या, त्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी पुरूषांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. झालेल्या प्रकारामुळे तिथले वातावरण ढवळून निघाले आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वांना पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीत हलवण्यात आले आहे. 12 जणांविरोधात आणि 150 अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. सदरचे एसडीएम राजेश कुमार शाह आणि एसडीपीओ सुरजित कुमार पांडे परिसरात तळ ठोकून होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST