Aditya L1: 'असा' असेल सौर मिशन 'आदित्य एल १'चा प्रवास - लीना बोकील यांची प्रतिक्रिया
Published : Sep 2, 2023, 3:32 PM IST
|Updated : Sep 2, 2023, 3:47 PM IST
पुणे :चंद्रानंतर आता सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोनं आदित्य एल 1 अवकाशात पाठवलं आहे. देशाचं पहिलं सौर मिशन 'आदित्य एल 1'चं आज सकाळी 11.50 ला यशस्वी प्रक्षेपण झालं. 'आदित्य एल 1' इस्रोच्या 'पीएसएलव्ही' अंतराळयानातून अवकाशात झेपावलं. आता ते 'लॅग्रेंज पॉइंट १' या ठिकाणाहून सूर्याचा अभ्यास करणार आहे. त्यामुळे हे ठिकाण खूपचं महत्त्वाचं आहे. हा पॉइंट पृथ्वीपासून सुमारे 15 लक्ष किमी अंतरावर स्थित आहे. एकूणच देशाचं पहिलं सौर मिशन 'आदित्य एल 1' चा प्रवास कसा असेल, याबाबत विज्ञान अभ्यासक लीना बोकील यांनी याबाबत सविस्तर माहिती दिलीय. आदित्य एल 1 हे सूर्याच्या प्रकाशमंडलातील चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करणार आहे. इस्रो या मोहिमेद्वारे पुढील पाच वर्षे सूर्याचा अभ्यास करणार आहे.