सहा याचिकांच्या निकाल द्यायचा असल्यानं विधानसभेच्या अध्यक्षांची आज कसोटी-उज्जवल निकम
Published : Jan 10, 2024, 1:40 PM IST
जालना :Mla disqualification case verdict एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील सत्तासंघर्षाबाबत आज सर्वात मोठी घडामोड असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सायंकाळी ४ नंतर निकाल देणार आहेत. आजचा निकाल म्हणजे लोकशाहीमध्ये मार्गदर्शक ठरेल, अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिलीय. आज शिवसेनेच्या दोनही गटाच्या आमदार अपात्रतेवर निकाल येणार आहे. त्यामुळं कही खुशी कही गम असा हा निकाल असेल. देशाच्या इतिहासातील ही पहिली घटना असेल. कारण न्यायालयानं जी काही निरीक्षणं नोंदवली त्यातून विधानसभा अध्यक्ष काय मार्ग काढतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. त्यामुळं आज अध्यक्षांचीच कसोटी म्हणावी लागेल. एकूण सहा पिटीशनचा निकाल विधानसभेच्या अध्यक्षांना द्यायचा आहे. ज्यांचं समाधान झालं नसेल, त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाता येईल असं निकम यांनी म्हणाले.