Video लक्ष्मीपूजनाची पूजा कशी मांडावी? काय सांगतात पुजारी? पाहा व्हिडिओ
नाशिक लक्ष्मीपूजनासाठी Lakshmi Pujan प्रत्येक पंचांगमध्ये सकाळ, दुपार आणि रात्रीचे वेगळे मुहूर्त सांगितले आहेत. नाशिकचे पूजारी प्रवीण शुक्ल याबाबतीत सांगतात की, लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षदांनी बनवलेला स्वस्तिक यावरच श्री लक्ष्मीची स्थापना करावी. त्यानंतर महालक्ष्मी आणि गणेश मूर्ती किंवा फोटोची पूजा करावी. त्यानंतर कलश पूजन करावे. फुले वाहावी. तुपाचा दिवा लावावा. आरती करावी. गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर तो प्रसाद सर्वांना वाटावा. लक्ष्मीपूजेला नाणी, चलनी नोटा, सोन्याचे, चांदीचे अलंकार यांचीही पूजा करावी. व्यापारी वर्गाने व्यवहाराचे दस्तावेज, वह्या, हिशोबाची कागदपत्रे पूजेत ठेवून त्यांचे पूजन करावे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST