Indian Cricket Team : टीम इंडिया पुण्यात दाखल, विमानतळावर चाहत्यांनी केलं जल्लोषात स्वागत; Watch Video - भारत विरुद्ध बांग्लादेश
Published : Oct 15, 2023, 7:57 PM IST
पुणे : Indian Cricket Team : देशात सध्या क्रिकेट विश्वचषकाची धूम आहे. शनिवारी टीम इंडियानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा दारुण पराभव केला. आता भारतीय संघाचा पुढील सामना १९ ऑक्टोबरला पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर बांग्लादेशविरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी रविवारी भारतीय संघाचं पुण्यात आगमन झालं. दुपारी चार वाजताच्या सुमारास भारतीय संघ पुणे विमानतळावर दाखल झाला. त्यावेळी चाहत्यांनी विमानतळावर मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. चाहत्यांनी टीम इंडियाचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. भारतीय संघ पुढील चार दिवस पुण्यात मुक्कामी असणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमवर विश्वचषकाचे ५ सामने होणार आहेत. त्यापैकी १९ तारखेला होणाऱ्या भारत विरुद्ध बांग्लादेश या पहिल्या सामन्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे, या सामन्याची सर्व तिकिटं विकल्या गेली आहेत.