महाराष्ट्र

maharashtra

बीबी का मकबरा

ETV Bharat / videos

Independence Day 2023: 'बीबी का मकबरा' रंगला तिरंगी रंगात, पाहा व्हिडिओ - स्वातंत्र्य दिन 2023

By

Published : Aug 15, 2023, 8:06 AM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) :स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आज बीबी का मकबरा येथे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील बीबी का मकबरा या वास्तूवर आकर्षक रोषणाई करण्यात आली. त्यामुळे जगप्रसिद्ध असलेला आणि ताजमहाल प्रतिकृती समाजाला जाणारा बीबी का मकबरा आज तिरंगी रंगात रंगला आहे. त्यामुळे पर्यटक आणि शहरवासीयांनी मकबऱ्याचे हे मोहक रूप पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. सुट्टीचा दिवस असल्यामुळे मागील दोन दिवसापासून पर्यटन स्थळावरील गर्दी वाढत चालली आहे. अनेक नागरिक मकबऱ्याचे हे मोहक दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद करत आहे.  स्वातंत्र्य दिनाचा सर्वत्र आनंद दिसून येत असताना बिबी का मकबराची रोषणाई पर्यटकांसाठी औत्सुक्याचा विषय ठरत आहे.   

ABOUT THE AUTHOR

...view details