Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावर झालेली दुर्घटना दुर्दैवी, अशोक चव्हाणांची भाजपवर टीका - The incident on Samriddhi Highway is unfortunate
नांदेड :बुलडाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्ग दुर्घटनेप्रकरणी ( Accident on Samriddhi Highway ) माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपवर टीका केली आहे. समृद्धी महामार्गावरील घटना दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. एवढ्या घाईत समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करण्याची गरज नव्हती. वाहने अतिशय वेगाने जात आहेत. कोणतीही उपाययोजना न करता अशी सुरुवात करणे चुकीचे आहे. या रस्त्यावर प्रतिबंधात्मक उपाय योजण्याची गरज आहे. या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत. सरकारने ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली. अशोक चव्हाण म्हणाले की, आम्हाला यात कोणतेही राजकारण आणायचे नाही. मात्र या रस्त्यावर लोकांचा मृत्यू होणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे शासनाने तातडीने या रस्त्यावर आवश्यक उपाययोजना कराव्यात. ही आमची मागणी आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले.